लसीकरण आपल्या दारी मोहिमेचं पालकमंत्र्यांकडून कौतुक

महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे यशस्वी आयोजन

ठाणे – ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आज नामदेववाडी, टेंभीनाका, उथळसर येथील आंबेडकर रोड, आनंदनगर या ठिकाणी लसीकरण ऑन व्हील या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के  यांनी या सर्व लसीकरण केंद्रास भेट देवून लसीकरण करुन घेतलेल्या नागरिकांची  विचारपूस केली. जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण व्हावे यासाठी लसीकरण मोहिम वाढविण्यासाठी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा घेत असलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

आनंदनगर येथे लसीकरण ऑन व्हील या मोहिमेचे आयोजन महापौर नरेश म्हस्के यांनी, टेंभीनाका, उथळसर येथील आंबेडकर रोड येथील शिबिराचे आयोजन उपमहापौर पल्लवी कदम व नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या सहकार्याने व नामदेववाडी येथील लसीकरणाचे आयोजन नगरसेविका रुचिता मोरे यांनी केले होते.  लसीपासून कोणीही ठाणेकर वंचित राहू नये यासाठी शहरात विविध ठिकाणी स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबिरे आयोजित केली जात आहे. या लसीकरण मोहिमेस स्थानिक नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने 50 हून अधिक लसीकरण केंद्रावर नियमित लसीकरण सुरू आहे. लसीकरण ऑन व्हील या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

आपला दवाखाना’ लसीकरण केंद्रास पालकमंत्र्यांनी दिली भेट

20 हजारांचा लसीकरणाचा टप्पा गाठणारे लसीकरण केंद्र म्हणजे आनंदनगर येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. या केंद्रासही आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते. आनंदनगर येथील आपला दवाखाना येथे नियमित लसीकरण हे अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने सुरू असल्याबाबत पालकमंत्र्यांनी येथील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 532 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.