ठाणे – केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस आपली विश्वासार्हताच गमावत चालली असून येत्या काही दिवसांतच युवानेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील काॅग्रेस पक्ष अधिकाधिक मजबूत होत चालला आहे आगामी काळात हे चित्र स्पष्ट होईलच असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश इंटक काॅग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी ठाण्यात व्यक्त केला.
समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाच्या कायम पाठीशी राहण्याचा काँग्रेसचा धर्म आहे आणि म्हणूनच काँग्रेसला कायम या घटकांनी मदतच केली असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवानेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील इंटक काॅग्रेसच्या वतीने युवानेते राहुल गांधी यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त ५१ कीन्नर कुंठुबांतील लोकांना जीवनावश्यक साहित्य वाटून राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश छाजेड उपस्थित होते या प्रसंगी ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,कार्यक्रमाचे आयोजक ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे व प्रविण खैरालिया, तसेच प्रवक्ते रमेश इंदिसे,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे, रविंद्र कोळी,महेंद्र म्हात्रे,बाबू यादव,प्रसाद पाटील,स्वप्नील कोळी,रेखा मिरजकर,रमेश पाटील,चंद्रकांत मोहिते,शितल आहेर, सुप्रिया पाटील,मीनाक्षी थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना छाजेड पुढे म्हणाले की,आज राहुल गांधीचा वाढदिवस वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करत असताना खर्या अर्थाने त्याना अपेक्षित असलेले काम इंटक माध्यमातून करण्याचा प्रयत्न सचिन शिंदे यांनी केला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनीही काॅग्रेसचा काॅग्रेस का हाथ,आम आदमी के साथ हा नारा असून त्याला काॅग्रेस कायम बांधील असून प्रत्येक घटकाच्या न्यायासाठी कटीबद्द आहे असे सांगितले.
477 total views, 1 views today
