ठाण्यात चारशे जणांनी घेतला लाभ
ठाणे – कोरोना आपत्तीमुळे लॉकडाऊनच्या नियमामुळे रोजगारापासून वंचित राहिल्याने मूलभूत गरज असलेल्या अन्नापासून तुटणाऱ्या समाजबांधवांची व्यथा लक्षात घेऊन कॅनरा बँकेने एक दिवस पोटभर जेवण हा उपक्रम मुंबई आणि ठाणे येथे अन्नछत्र चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांच्या सहकार्याने केला.
बुधवार दिनांक १६ जून रोजी चांगल्या दर्जाचे जेवण तयार करून त्याचे योग्य प्रकारे पॅकिंग करून बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वितरण केले. कॅनरा बँकेच्या मुंबई आंचल कार्यालयाचे प्रमुख संतोष यांनी आपल्या विभागात येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विशिष्ट ठिकाणी एक दिवस पोटभर जेवण ही योजना राबवली.
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल समोर येथे गेली तेरा वर्षे सुरु असल्येला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे ठाणे क्षत्रिय कार्यालयाच्या प्रमुख गीता के बी, सहाय्यक महाप्रबंधक फणीकुमार आणि अधिकारी-कर्मचारी वृंद यांनी चारशे जेवणाची पाकिट गरजूंना आस्थेने दिली. गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर,गरीब रुग्णांचे नातेवाईक यांना अन्न पाकिटे वाटल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद बँकेला समाधान देणारा ठरला. ठाणे क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख गीता के.बी. यांनी उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. कॅनरा बँकेने घेतलेल्या पुढाकाराची गीता के. बी. यांनी सविस्तर माहिती दिली. या वैशिष्टयपूर्ण उपक्रमाचे अनुकरण वैयिक्तिक पातळीवर करण्याचे आवाहन गीता यांनी केले.
439 total views, 1 views today