महेश कदम यांचे लोटांगण आंदोलन

बिलाची रक्कम पूर्ण न दिल्याने १६ तास मृतदेह हॉस्पिटलच्या ताब्यात 

ठाणे –  ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये कोरोना ग्रस्त संदीप तिखे यांचा मृत्यू १५ जुन रोजी सायंकाळी ८:३०च्या सुमारास झाला. बिलाची पूर्ण रक्कम न मिळाल्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तब्ब्ल १६ तास मृतदेह आपल्या ताब्यात ठेवला. त्यामुळे या विरोधात मनसेचे महेश कदम यांनी चक्क हॉस्पिटलच्या प्रवेश  द्वारासमोर लोटांगण आंदोलन केले. अखेर रुग्णालय प्रशासनाला नमते घेत बिलाची रक्कम माफ करून मृतदेह ताब्यात घ्यावा लागला.    
कोरोनाचा उपचार घेण्यासाठी संदीप तिखे हे कौशल्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी पैशाची जुळवाजुळव करून दीड लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले. उपचारादरम्यान संदीप तिखे यांचा  १५ जुन रोजी रात्री ८:३० वाजता मृत्यू झाला. संदीपच्या यांच्या परिवाराला हॉस्पिटल कडून ३ लाख ३९ हजार बिल झाल्याचे सांगण्यात आले. संदीपच्या परिवाराची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी बिल कमी करण्यासाठी हालचाली केल्या आणि त्यातून त्यांची २७ हजारांची रक्कम कमी करण्यात आली. उर्वरित रक्कम या परिवाराला देणं शक्य नसल्याने त्यांनी मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याशी संपर्क साधला. महेश कदम यांनी कौशल्य हॉस्पिटलचे एच आर अनंत नाईक यांच्याबरोबर संवाद साधून मृतदेह परिवाराला देण्याची विनंती केली. शासनाच्या गाईडलाईन समजावून दिल्या परंतु त्यांनी ऐकले नाही. महेश कदम यांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील देत बुधवारी सकाळी हॉस्पिटल प्रशासनाच्या या मुजोरगिरी विरुद्ध  कदम यांनी हॉस्पिटलच्या गेट समोर लोटांगण आंदोलनास सुरुवात केली. १५ मिनिटांनी प्रशासनाने नमते घेत बिल माफ केल्याचे जाहिर करीत हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना मृतदेह ताब्यात दिला.

 544 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.