शिवसेना भवनासमोर सेना -भाजप कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले


शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपावर टीका करण्यात आली होती

या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चा कडून शिवसेना भवन येथे  विरोध प्रदर्शन करण्यात आलं

याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी सेनेचे कार्यकर्ते देखील जमले होते यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले

मुंबई  – भाजपच्या युवा मोर्चानं शिवसेना भवनासमोर काढलेल्या ‘फटकार’ मोर्चामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिगणी पडली. त्यातून शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळं दादरमध्ये तणाव असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याची चर्चा जोरदार रंगू लागली.या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला.  शिवसेनेनंही यावरून भाजपवर निशाणा साधत चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेने हिंदू धार्मिक स्थळ , हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला असल्याचं म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.   बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी म्हटलं आहे. कुणीही महिलांवर हल्ला केलेला नाही. पोलिस तिथं उपस्थित होते, असं श्रद्धा जाधव म्हणाल्या. 

 310 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.