ठाणे – शासनाच्यावतीने MahaDBT प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-2021 चे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असुन 30 जून 2021 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवत्ती करीता अर्ज करावेत. सदर मुदत ही अंतिम असुन विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.
शासनामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परिक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती इ. योजना राबविल्या जातात. सदर योजनेकरीता विद्यार्थी MahaDBT या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करुन शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी सदर मुदत वाढीचा लाभ घ्यावा. मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित निकाली काढावेत. शिष्यवृत्ती पासुन कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.
533 total views, 1 views today