चौकशी समित्यांचा फक्त फार्स ठामपा कोणाच्या दबावाखाली?

सनदशीर लढाईचा आ. संजय केळकर यांचा इशारा

ठाणे – विविध प्रकरणांचा तपास करण्यासाठी ठाणे महापालिकेने फक्त चौकशी समित्या नेमून फार्स केला, पण त्यातून अद्याप काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का, असा प्रश्न करत आमदार संजय केळकर यांनी या प्रकरणी वेळ पडल्यास सनदशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा दिला आहे.

ग्लोबल, पार्किंग प्लाझा रुग्णालय येथील लसीकरणातील गैरप्रकार, नाल्यात पडून मृत्यू याबाबत आयुक्तांनी चौकशी समित्या नेमल्या, पण त्याचा अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कच्या घोटाळ्याबाबतही चौकशी समित्या नेमल्या पण प्रत्यक्षात कारवाई शून्य झाल्याचे आ. केळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

केवळ चौकशी समित्या नेमून कारवाईबाबत टाळाटाळ होत असेल तर संबंधित दोषी व्यक्ती, अधिकारी यांना भ्रष्टाचार करण्यास आणि गुन्हे करण्यास खतपाणीच मिळत आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या ठाणेकरांवर हा अप्रत्यक्ष अन्यायच आहे. कारवाई टाळण्यामागे दोषींना पाठीशी घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे का? की ठामपा कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यास धजावत नाही, असे प्रश्न श्री.केळकर यांनी उपस्थित केले आहेत. जनहीतासाठी कारवाई होणे आवश्यक असून त्यासाठी गरज भासली तर सनदशीर मार्ग पत्करू, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

 263 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.