ठाणे – मासुंदा तलावाचा कायापालट होत असून या तलावाचे शुशोभीकरण काम १० मार्च २०२१ रोजी कामे पूर्ण होतील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ही कामे जलद गतीने मार्गी लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी खासदार यांनी मासुंदा तलावाच्या कामाच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मासुंदा तलावाची प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली. त्यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, मोहन कलाल ,उपअभियंता रोहित गुप्ता, भगवान शिंदे ,विद्युत विभागाचे अभियंता विनोद इंगळे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान ,वृक्ष प्राधिकरणाच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे ,वृक्ष प्राधिकरण अधिकारी धावडे व राहुल दुरगुडे व स्वच्छता निरीक्षक इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान विद्युत विभागामार्फत दिवे बसविण्यादाबत असलेले अपूर्ण कामे ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ असलेले अपूर्ण कामे ,पानपोई समोरील जागेचा वापर रस्ता रुंदीकरणासाठी करणे, एम्पी थेटर अहिल्यादेवी होळकर घाटापर्यंत जोडणे तसेच संपूर्ण तलावाची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही व सुरक्षारक्षकांची नेमणूक तसेच स्वच्छता निरीक्षक यांची नेमणुकीबाबत असे अनेक कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले ही सर्व अपूर्ण कामे 10 जुलैपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. काल रात्री उशिरा काचेच्या पदपथावर रोषणाईचे प्रत्यक्षित दाखविण्यात आले यासंदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन कुमार शर्मा यांनाही खासदार राजन विचारे यांनी शनिवार १० जुलै रोजी या मासुंदा तलावाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजिले आहे यासाठी अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या स्तरावरून अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
450 total views, 1 views today