सत्ताधाऱ्यांनी सांगावे कोणत्या नेत्याचा आणि अधिकाऱ्याचा सत्कार करु – गणपत गायकवाड

पहिल्या पावसात ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी  सांगावे कोणत्या नेत्याचा आणि अधिकाऱ्याचा  सत्कार करु भाजप आमदार गणपत गायकवाड यांची  टिका

कल्याण – नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसाच्या फटक्याने नागरीकांच्या घरात पाणी भरले आहे. दरवर्षी २०  ते २५  कोटी रुपयांचे टेंडर काढले जाते. मात्र कोणत्याही प्रकाराचे काम होत नाही. आज जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यासाठी कोणत्या नेत्याचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करु हे मला सत्ताधाऱ्यांनी  सांगावे. लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्व भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने त्यांनी आज पाहणी केली. या पाहणी दरम्यान आमदारांनी हे विधान केले आहे.  

 444 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.