आर.पी.आय. वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले नामकरण

ठाणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( आठवले ) वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार  लोकनेते, दि. बा. पाटील यांचे नाव सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या बोर्डावर कळंबोली- उरण हायवेवर देण्यात आले.
रिपब्लिकन युवा नेते, अँड. यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन  करण्यात आले.
दि. बा. पाटील हे फक्त आगरी, कोळी, समाजाचे नेते न्हवते तर ते फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील बहुजनांचे नेते होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्यांनी काम केलंय. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे ह्यासाठी त्यांनी आंदोलन केले आणि त्यामुळे आता लोकनेते,दि. बा. पाटील साहेब यांच्या नावासाठी रिपब्लिकन पक्ष व भीमसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा ह्यावेळी अँड. यशपाल ओहोळ यांनी दिला.तसेच दि. बा. पाटील यांचे नाव ह्या राज्यसरकारने दिले नाही तर सरकारला बांगड्याचा आहेर दिला जाईल असे नवी मुंबई महिला अध्यक्षा, शिलाताई बोधडे यांनी इशारा दिला.
हे आंदोलन भरपावसात केले ह्या आंदोलनात मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, विशाल कांबळे, बाळू गायकवाड, इम्रान शेख, रणधीर मखरे, रमेश खिलारे, सुशांत ओहोळ, महेश लंकेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 319 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.