पावसाचा जोर वाढला

ठाणे – ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे आता शहरातील सखल भागात पानी साचण्यास सुरवात झाली आहे, दुपारी १.२० वाजता खाडिला 3.83 मिटरच्या लाटा उसळणार आहे, त्यामुळे पालिकेने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता पर्यन्त २९.२० मिमी पावसाची नोंद जाली आहे, पावसामुळे ठाणे – येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आनंद नगर एथिल ट्राफिक पोलिस चौकी समोर पावसाचे पाणी साचण्यास सुरवात झाली, तसेच आनंद नगर टोल नाकयावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याशिवाय दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला.ढगाळ वातावरण, ठाण्यातील मुख्य बाजार पेठ या ठिकाणी पाणी साचले होते. चालती वाहने बंद पडल्यामुळे दुचाकी स्वाराची नाचक्की, नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच पावसाचा जोर वाढला असल्याने पालिकेच्या नाले सफाई चा दावा हा पूर्णपणे फ़ोल ठरला आहे. वंदना सिनेमा, राम मारुति रोड, गडकरी रंगायतन आदिसह दिवा भगाता ही अनेक घरात पाणी साचले आहे, पुढील काही तास असाच असा पाऊस पड़त राहिला तर परस्थिति भंयकर होउ शकणार आहे. पावसाच्या परिस्थितिचा सामना करण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज आहे. परंतु काम नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन पालिकेने केले आहे.

 379 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.