मुंबईत पाणी तुंबले
बीएमसीचे 104 टक्के नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल – काँग्रेस गटनेते रवी राजा
मुंबई – जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा खोळंबा झाला असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईतील विविध भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाचा जोर असेल असा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. पूर्व उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
शहरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. यावर महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, असे महापौर म्हणाल्या. तर आयुक्तांनी पावसावरच खापर फोडले आहे. तर विरोधकांनी शिवसेनेलाच जबाबदार धरत टीका केली आहे.
426 total views, 1 views today

