ठाणे – गेल्या अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सर्विस रस्त्याचे काम खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला वर्सोवा पुलाचे काम सुरू असल्याने मुंबई तसेच गुजरात कडे जाणारी जड अवजड वाहने याच जंक्शन वरून जात असताना फाउंटन येथे वाहतूक कोंडी होत असल्याने मिरा भाइंदर महानगरपालिकेने फाउंटन हॉटेल बाहेरील अतिक्रमनित असलेली जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सर्विस रोड उपलब्ध करून दिला त्यावर महानगरपालिकेने सदर रस्ता नवीन बनविण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरू केला होता परंतु कालांतराने सदर रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडे वर्ग केल्याने या रस्त्याची डागडुजी करण्यात विलंब लागत होता खासदार राजन विचारे यांच्या ही बाब लक्षात येताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम विभागाची बोलून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी त्या वेळेस केली करण्यात आली होती या 300 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेल्या रस्त्याचे काम आज सुरू झाले असून सदर चे काम सुरू असताना खासदार राजन विचारे यांनी आज मीरा-भाईंदर आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत पाहणी केली त्यावेळी सार्वजनिक विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे साहेब आमदार गीता जैन ,जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर ,विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग ,मीरा भाईंदर महानगर पालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बामणे तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते या रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार मानले आहे
मिरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाचे मिटर मोजणी पंप चेना ब्रीज जवळ सुरू -खासदार राजन विचारे
प्रतिनिधी -मीरा-भाईंदर या शहराला स्टेम प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होत असताना मीटर मोजणी चे ठिकाण माणकोली येथे असल्याने त्या ठिकाणी पाणी घेण्यासाठी आलेल्या इतर लाईन सुद्धा जोडणी केलेल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणांमुळे मीरा-भाईंदर शहराला पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता नुकताच आयुक्त दिलीप ढोले यांनी या मीटर मोजणी चे ठिकाण चेना ब्रिज जवळ करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू केला होता या प्राधिकरणाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर कमिटीचे चेअरमन ठाणे महापालिका आयुक्त बिपिन कुमार शर्मा हे असल्याने यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा सुरू करून सदर मीटर मोजणीचे ठिकाण मानकोली ऐवजी चेना ब्रीज जवळ मीटर बसविण्यात आलेले आहे त्यामुळे शहरासाठी पाणी अधिक दाबाने उपलब्ध यामुळे होणार आहे तसेच पाण्याची मोजनी अचूकपणे मिळणार याचा फायदा मीरा भाईंदर महा नगरपालिकेला होणार आहे
417 total views, 1 views today