‘उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’ भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

मुंबई : मराठा आरक्षणासह राज्यातील अनेक मुद्द्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवरून राज्यात मात्र राजकारण पेटल्याचं दिसून आलं.  या भेटीवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरत जोरदार टोला लगावला आहे. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे. . यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?

‘हे ट्विट करताना अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र शेअर केलं. यावर ‘उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे, सतत केंद्राने हे दिले नाही ते दिले नाही म्हणून रडत असतात’ असं लिहण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विट करत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ कोटी लशी एकरकमी चेक देऊन खरेदी करायला आपण तयार असल्याचे फेसबुकलाइव्हच्या माध्यमातून सांगितले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यानीच सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे १२ कोटी लस खरेदी करण्यासाठी लागणारे ७ हजार कोटी रुपये वाचले आहे. आता या रकमेतून गोरगरीबांसाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.

 304 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.