खासदार नवनीत राणा यांची  खासदारकी धोक्यात?

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक ०८.०६.२०२१ रोजी घोषीत करण्यात आला.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जोरदार झटका बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला. 

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार – खासदार नवनीत राणा

गेल्या नऊ वर्षांपासून मी ही लढाई लढत आहे, हायकोर्टाचा निकाल आला तरी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू, तिथे न्याय मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणांनी व्यक्त केला. 

  

 315 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.