ओबीसींचा अनुशेष तात्काळ भरा


ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ राज्य कार्यकरिणीच्या ऑनलाईन बैठकीत एकमुखी मागणी

मुंबई – ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक ६ जून रोजी शिवराज्यभिषेक दिनाच्या पर्वावर संपन्न झाली. ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे तदवतच ओबीसींचा शासकीय सेवेतील अनुशेष तत्काळ भरण्यात यावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच मागणीच्या पूर्ततेसाठी दिशा ठरविण्यात आली.

अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके होते. मुंबई महानगर अध्यक्ष महादेव मिरगे , राज्यस्तरीय सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, आशिष वाघ, कोकण विभागीय अध्यक्ष विजय केसरकर, नाशिक विभागीय अध्यक्ष उदय देवरे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.आश्विनी खडसे, नागपूर विभागीय अध्यक्ष निवृत्ती तांगडे यांच्यासह राज्यातील जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी)  नोकरीमधील पदोन्नतीत आरक्षण मिळावे, अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे. दरम्यान तत्कालीन परिवहन मंत्री सुरुपसिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन उपसमितीने  ओबीसींना नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत १९ टक्के आरक्षण देण्याची शिफारस २००६ मध्ये मंत्रिमंडळाला केली होती.  परंतू अद्यापही ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले नाही. जवळपास १५ वर्षे झाली ही शिफारस  पडून आहे.  ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने ओबीसींच्या प्रश्नांवर सातत्याने  आवाज उठवला आहे. पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करावा.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात ओबीसींच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. शासनाकडे ओबीसीच्या रिक्त जागा भरण्याविषयी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. अद्यापही रिक्त जागेचा अनुषेश खूप मोठा आहे. रिक्त जागांचा अनुशेष तत्काळ दूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

 298 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.