ठाणे – यंदा वटपौर्णिमेचे औचित्य साधून ठाण्यातील जयश्री कलेक्शन या नामवंत ज्वेलरी ब्रांड द्वारे महिलांसाठी खास उखाण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वटपौर्णिमा हा महिलांसाठी आनंददायी सण असतो आणि हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसेच लॉकडाउन काळात महिलांना दिलासा देण्यासाठी ही उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक महिलेला एक उखाणा घ्यायचा आहे. या उखाण्यामध्ये कोणत्याही एका दागिन्याच्या नावाचा उल्लेख असावा. प्रत्येक महिलेला फक्त एकच उखाणा घ्यायचा आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे आपण घेतलेल्या उखाण्याचा वीडीओ आणि सोबत सांजशृंगार केलेला एक फोटो ९३७२४६००८६ या मोबाईल नंबर पाठवायचा आहे. वीडीओ व फोटो पाठविण्याची अंतिम तारीख २० जून आहे. सदर उखाणा स्पर्धेचे परीक्षक म्हणून लोकप्रिय टीवी मालिका होणार सून मी या घरची फेम सहा सासूबाई असणार आहेत.तसेच विजेत्या स्पर्धकांना भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचा निकाल हा वटपौर्णिमेच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने कळविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त महिलांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन जयश्री कलेक्शनच्यावतीने करण्यात आले आहे.
604 total views, 1 views today