कोळीवाड्यातील घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा खा. विचारे यांची नगरविकास मंत्र्याकडे मागणी  

ठाणे नवी मुंबई व मीरा-भाईंदर या किनारपट्टीवरील  कोळीवाड्यातील  निवासी घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा

खासदार राजन विचारे यांची पर्यावरण मंत्री व नगर विकास मंत्री यांच्याकडे मागणी…

ठाणे  – नुकताच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघर सह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सीमांकन करून त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार आहेत. त्यामध्ये खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या भागातील खाडी किनारी व समुद्र किनारपट्टी वरील कोळीवाड्यातील सीमांकन निश्चित करून निवासी घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी पत्राद्वारे केली. या मागणीमध्ये खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांचा बहुतांशी भाग खाडीकिनारी व समुद्रकिनारी असल्याने या किनार पट्ट्या वरील मच्छीमारी करणाऱ्यांच्या कोळी बांधवांची संख्या अधिक असल्याने त्यांची निवासी घरे कमकुवत झालेली आहेत. परंतु नवीन नियमावली प्रमाणे सी आर झेड 2019 च्या नव्या अधिसूचनेनुसार सुधारित नकाशे बनविण्याचे काम केंद्र सरकार कडील पर्यावरण खात्याच्या नॅशनल सेंटर ऑफ सस्टनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएसीएम) संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामध्ये ठाणे, पालघर सह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील कोळीवाड्यांचे सीमांकन करून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या किनारपट्टीवरील धोकादायक झालेल्या कोळीवाड्यांच्या निवासी घरांच्या पुनर्विकासाचा ही समावेश करून घ्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली.

 288 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.