ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ऑनलाईन नोंदणीपासून वंचित असणाऱ्या तसेच लसीकरणासाठी शहरात ये-जा करणे सहज शक्य नसणाऱ्या आदिवासी पाड्यातील बांधवांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी येऊर गाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या येऊर गाव, पाटीलवाडी महापालिका शाळेजवळील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक ४ जून २०२१ पासून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत तसेच ‘वॉक इन’ पद्धतीने नागरिकांनाच लस देण्यात येत आहे, परंतु ऑनलाईन नोंदणीपासून आदिवासी पाड्यातील नागरिक वंचित राहिले असून लसीकरणासाठी त्यांना शहरात येणे सहज शक्य नाही. यासोबतच लसीकरणाबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज देखील आरोग्य विभागाच्यावतीने दूर करण्यात आला असून या सर्व आदिवासी बांधवाना प्राधान्याने लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या येऊर गाव, पाटीलवाडी महापालिका शाळेजवळील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक ४ जून २०२१ पासून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
352 total views, 1 views today