ग्लोबलमधील डॉक्टरांनी केला शानू पठाण यांचा सत्कार

ठाणे – कोरोनाचा कहर माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्या सुमारे 46 डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महानगर पालिकेने घातला होता. हा डाव गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी उधळून लावला. तसेच, या डॉक्टरांची सेवा अबाधित ठेवली. त्याबद्दल या सर्व डॉक्टरांनी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात येऊन शानू  पठाण यांचा सत्कार केला.
  कोरोनाच्या दुसर्या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बीयूएमएस डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते. सुमारे 60 हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची वेतनश्रेणी पालिकेकडून देण्यात येत होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्संनी काम केले होते. त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या डॉक्टरांनी सोमवारी शानू पठाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शानू पठाण यांनी या डॉक्टरांवरील अन्यायाविरोधात लढा देण्याचा इशारा दिला होता. तसेच, डॉ. जितेंद्र् आव्हाड यांच्याशी संपर्क साधून ही समस्या सोडविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या डॉक्टरांची सेवा अबाधित ठेवण्यात आली. त्यामुळे या डॉक्टरांनी शानू पठाण यांचा सत्कार केला.
या प्रसंगी सर्व डॉक्टरांनी शानू पठाण यांचे आभार मानले. तर, “ डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनामुळेच 46 जणांची नोकरी वाचविण्यात यश आले आहे. या पुढेही आपण अशापद्धतीने गोरगरीबांच्या हक्कांसाठी लढत राहणार आहोत, असा निर्धार शानू पठाण यांनी व्यक्त केला.

 377 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.