अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राची वैधता तपासून घ्यावी

ठाणे – वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोकण विभागातील विद्यार्थी, (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अर्जदारांनी विहीत कालमर्यादेत जमात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचे आवाहन करण्यांत येत आहे.
कोकण प्रशासकीय विभागातील वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी एसटी राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहीत कालमर्यादेत पूर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यांत आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा जमात दावा पडताळणी प्रस्ताव ठाणे येथील समिती कार्यालयास सादर केला असेल तर त्यासंदर्भात पुढील पडताळणी कार्यवाही करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव पत्ता व इतर आवश्यक माहितीसह विनंती अर्ज या कार्यालयाचे ई-मेल आयडी tcscthane@yahoo.com वर सादर करावा विद्यार्थी पालकांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळली जावी, विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पुर्ण व्हावी, असे आवाहन सहआयुक्त, कोकण विभाग, यांनी केले आहे.

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.