कामगार नेते बी एन सिंग यांचे दिर्घ आजाराने निधन

ठाणे – ठाण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कामगार नेते बी.एन.सिंग यांचे मंगळवारी वयाच्या ७६ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले गेले काही दिवस ते ज्युपिटर रूग्णालयात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले.त्याच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार होता.
बी.एन.सिंग हे जरी राजकारणात सक्रिय होते तरी त्यांनी जास्तीत जास्त कामगार क्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते. रेमन्ड मिल पासून अनेक कंपन्यामध्ये त्यांनी कामगाराचे नेतृत्व केले व कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नेतृत्वाबरोबरच त्याचे भाषणावर खूप चांगल प्रभुत्व होते.त्यांच्या अंतिम विधि बुधवारी दुपारी १२ वाजता वागळे इस्टेट येथील स्मशानभुमीत करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,इंटक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी रूग्णालयात धाव घेतली.

 356 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.