विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडवणीस यांच्या मुक्ताई नगर येथील पाहणी दौऱ्यात एका युवकाने गाड्यांचा ताफा थांबवून विष प्राशन करण्याचा प्रयन्त केला
जळगाव – विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडवणीस यांच्या मुक्ताई नगर येथील पाहणी दौऱ्यात एका युवकाने गाड्यांचा ताफा थांबवून विष प्राशन करण्याचा प्रयन्त केला.मुक्ताई नगर येथील मेळसंगवे गावात मंगळवारी दुपारी १ वाजता हा प्रकार घडला. योगेश पाटील असे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नावं आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा ताफा या शेतकऱ्याच्या शेतजवळून जात होता. तेव्हा त्याने गाड्यांचा ताफा असून आपल्या शेताची पाहणी करावी असा आग्रह केला. आपल्या शेतातील केळीचे नुकसान झाले आहे.पाहणी केली नाही तर आत्महत्या करेन असे ओरडत होता. आपला दौरा फोटोसेशन साठीआहे असा आरोप देखील त्याने केला. यावेळी योगेश पाटील याने विषाचा डबा सोबत ठेवला होते तो पोलिसांनी जप्त केला.
554 total views, 3 views today