आमदार रविंद्र चव्हाण हे पोस्टर बाँय – शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे

डोंबिवली – पालिकेची सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र लढवून राज्यात आणि मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आपली सत्ता कायम ठेवली होती. मात्र मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षात नाराजीचे सूर उमटत राज्यपातळीवर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कोरोना काळातही एकमेकांवर जोरदार टीका करणे सुरूच ठेवले.शहरपातळीवरहि पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत.घनकचरा व्यवस्थापन कराबाबत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी हा कर जाचक असल्याचा आरोप करत थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देत डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेत पत्रकार परिषद घेऊन आमदार चव्हाण हे प्रसिद्धीसाठी शिवसेनेवर आरोप करत असल्याचे सांगत आमदार चव्हाण हे पोस्टर बाँय असल्याची टीका केली.

काही दिवसांपासून आमदार रविंद्र चव्हाण यांनी दोन ते तीन पत्रकार घेऊन शिवसेनेवर टीका केली.याला उत्तर देण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार चव्हाण यांच्यावर पलटवार केला. शहरप्रमुख मोरे म्हणाले,गेल्या ११ वर्षापासून रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीत आमदार आहेत. मात्र या कार्यकाळात त्यांनी डोंबिवलीसाठी केलेले एक तरी विधायक काम दाखवून द्या. त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीत सर्वात घाणेरडे शहर असे म्हटले होते. करोना आपत्ती काळात गेल्या दोन वर्षात आमदार चव्हाण यांनी काय काम केले.यासारखे प्रश्न उपस्थित करुन राजेश मोरे यांनी आमदार चव्हाणांवर निशाणा साधला.खासदारडॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या विकास कामांची

यादी वाचण्यासाठी वेळ कमी पडेल.आपल्यानंतर राजकारणात आलेल्या आणि खासदार झालेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळत असलेला असणारा जनतेचा पाठिंबा पाहून त्यांच्या आकसापोटी चव्हाण यांच्या कडून असे आरोप होत असल्याचेहि मोरे म्हणाले.शिवसैनिक राजेश कदम म्हणाले,घनकचरा व्यवस्थापन कचरा कर लागू केल्यानेआमदार चव्हाण यांनी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. एकिकडे पेट्रोल, डिझेल, गँस,  दरवाढ झाल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.त्यासाठीही आमदार यांनी कधीतरी बँनरबाजी करावी असा टोला कदम यांनी पत्रकार परिषदेत लगावला.यावेळी संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती सुधीर पाटील, विभाग प्रमुख तुषार शिंदे, कार्यक्रम प्रमुख सतिश मोडक, विभाग प्रमुख अमोल पाटील,कविता गावंड आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

भाजप खासदारांच्या टीकेवर मौन

 भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी केडीएमसिने लागू केलेल्या घनकचरा व्य्वस्थापान कर रद्द करावा अशी मागणी केली आहे.याबाबत शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना विचारले असता मोरे यांनी खासदार पाटील यांच्यावर टीका केली नाही.त्यामुळे एकाच विषयावर भाजपच्या आमदारांवर टीका आणि भाजपच्या खासदारांबाबत मौन ठेवले गेल्याने यावर पत्रकारांना आश्चर्य वाटले.

 336 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.