मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे प्रभागात कोरोनासंबंधी सेवाकार्य

आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांची माहिती

ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजपा ठाणे शहरातील प्रभागांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.

आमदार निरंजन डावखरे यांनी की, ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्ये ३० मे रोजी भाजपाचे कार्यकर्ते भेट देतील. तेथील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. तसेच भाजपाचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल. भाजपाच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते ३० रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहेत
ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.