कामगारांना कोव्हीड भत्ता त्वरित द्या काँग्रेसची मागणी 

ठाणे – ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कन्ट्राटी व ठोक मानधनावर काम करित असलेल्या कामगारांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेला डिसेंबर २१ पर्यंतचा कोविड भत्ता त्वरित देण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर असंघटीत कामगार काॅग्रेस अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे एका पत्रकाद्वारे संदिप शिंदे यांनी मागणी केली असून या पत्र या पत्रकात त्यांनी सांगितले की नियमित,अत्यावश्यक,कन्त्राटी कर्मचारी वर्गाने मागील वर्षांपासून कोरोना कालावधीत प्रवासासह,विविध अडचणीचा सामना करत आपले कर्तव्य बजावत होते स्वतःच्या परिवाराचा धोका पत्करून कर्मचा-यांनी त्याची जबाबदारी पार पाडली अशा परिस्थितीत सेवा केली असतानाही त्यांना अद्याप शासनाने निश्चित केलेला कोविड भत्ता देण्यात आला नसल्याबद्दल खंत केली आता पुन्हा आपन दुसर्‍या लाटेचा सामना करित असतान निदान आतातरि या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता द्यावा अशी मागणी संदिप शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

 308 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.