धोकादायक इमारतीमधील रहिवाशांसाठी उचला पावले
ठाणे – महापालिका प्रशासनाने ४५५६ इमारती धोकादायक म्हणून जाहिर केल्या आहेत. त्यातील ७३ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन त्यावर तोडक कारवाई सुरु झाली आहे. परंतु या इमारतीत राहणाऱ्यांसाठी पावसाळ्यापूर्वी संक्रमण शिबिरे उभारण्यात यावीत अशी मागणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावर यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
ठामपा प्रशासनाने धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई देखील सुरु झालेली आहे. धोकादायक इमारती जाहीर करण्यासाठी देखील दरवर्षी पालिकेच्या माध्यमातून स्पर्धा सुरु असते. वास्तविक ठाणो महापालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजनेचे कामकाज ठाणो महापालिका क्षेत्नात चालू असतानाच येथील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे उभारण्यासाठी अंदाज पत्नकात १५ कोटी ७५ लाख राखीव तरतूद असतानाही अजुन पर्यंत त्याबाबत कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संक्र मण शिबिरे निर्माण न करता प्रशासन नागरिकांच्या मालमता आणि जिविताशी खेळत आहे. भविष्यात कोणतीही जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी तात्काळ बाधीत होणाऱ्या नागरिकांसाठी संक्रमण शिबिरे निर्माण करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.
380 total views, 1 views today