शासनाचा १५ % फी माफीचा निर्णय पालकांचा समज फी माफ   

शासनाने १५ टक्के फी कमी केली, पालकांना वाटतेय शासनच भरणार सर्व फी !
संकटातील साधना एज्युकेशन ट्रस्टचे शिक्षण मंत्र्यांना साकडे !!

ठाणे – महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने २०२०- २१ या शालेय वर्षासाठी १५ टक्के फी माफीचे पत्रक काढले. पण पालकांना वाटतेय की शासनच सर्व फी भरणार आहे. यामुळे पालक फीच भरत नसल्याने शाळा अडचणीत आल्या आहेत. यामुळे आता शासनानेच पालकांना फी भरण्यासाठी आवाहन करावे, अशी विनंती करणारे पत्र साधना एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका रचना राकेश पाटील, रंजना विजय पाटील व मुख्याध्यापिका अश्वीनी मिलिंद सोनावणे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.

१९९७ साली शासन मान्यतेने सुरु झालेले खारेगाव येथील साधना एज्युकेशन ट्रस्टच्या साधना विद्यामंदिराने १ ली ते १० वी चे वर्ग सुरु केले. येथे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. शासन नियमानुसार यात २५ टक्के मागासवर्गीय मुलेही आहेत. शाळेचा २०११-१२ पासून १० वी चा निकाल ९५ टक्के लागत आला आहे. लाॅकडाऊन च्या काळात शाळेतील शिक्षक मोबाईल व इंटरनेट द्वारा मुलांना शिकवत आहेत. लाॅकडाऊन आणि माफक फी यामुळे शिक्षकांना सध्या ५० टक्के वेतन दिले जाते. लाॅकडाऊनची स्थिती पाहून संस्थेने स्वतःहून २०-२१ साली १० टक्के फी कमी करुन पालकांना दिलासा दिला. अशातच १५ टक्के फी माफ करण्याचे आलेले शासन पत्रक संस्थेने सर्व पालकांना मोबाईलवरुन पाठविले पण पालकांची मनस्थिती अशी झाली की शासनच सर्व फी भरणार आहे यामुळे पालकवर्ग शाळेची फी भरण्यास तयार नाही.  यामुळे शासनाने निश्चित धोरण ठरवून १५ टक्के फी कमी करुन शालेय फी भरण्याचे शिक्षणमंत्र्यांनी, पालकांना आवाहन करावे अन्यथा शिक्षण संस्थांना शिक्षकांना वेतन देणे जिकरीचे जाईल अथवा शिक्षण संस्था बंद होतील. या परिस्थितीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नोंद घ्यावी अशाअर्थाचे पत्र साधना एज्युकेशन ट्रस्टच्ये संचालिका रचना राकेश पाटील, रंजना विजय पाटील व मुख्याध्यापिका अश्विनी मिलिंद सोनावणे यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविले आहे. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन १० वी इयत्तेच्या परिक्षा घेऊ नयेत आणि ८ वी व ९ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षेच्या गुणांची नोंद करुन सरासरी गुण पाहून निकालपत्र तयार करण्याविषयी धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असेही आवाहनही संस्थेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केले आहे.

 246 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.