ठाणे – ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी मंगळवारी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली.
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना राज्य शासनाने महासंचालक पदी बढती देऊन त्यांची बदली केली होती. त्यांच्या रिक्त जागी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने सोमवारी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती. जयजीत सिंग यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
574 total views, 1 views today