नाले सफाई नाही हितर हात सफाई

ठाणे –  आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे  यांनी आज ठाण्यातील खोपट, श्रीनगर ,राबोडी,वाघळे इस्टेट ते कोपरी याभागातील नाले सफाईचा पाहणी दौरा केला.  या दौऱ्यात भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, जेष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक संदीप लेले, नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, रमेश आम्रे तसेच महापालिका अधिकारी व भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.  पालिकेने ७५ टक्के नाले साफ केल्याचे सांगितले परंतु पाहणी दौऱ्यात नालेसफाई झाली नसल्याने पालिका ठाण्यातील नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला तर  आमदार केळकर यांनी हि नाले सफाई नसून सत्ताधाऱ्यांची हात सफाई आहे असा आरोप केला आहे. वर्षानुवर्षे  ठाणेकर जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जाते आणि या कामात करोडो रुपये ठेकेदारांना देऊन काम पूर्णपणे होत नसल्याचेही केळकर म्हणाले. 
नालेसफाई पाहणी दौरा करत असताना स्थानिक नागरिकांनीही आ. केळकर व आ. डावखरे यांच्याकडे नालेसफाई बाबत तक्रारी केल्या. यावेळी आ. संजय केळकर यांनी ही नाले सफाई नसून हात की सफाई असल्याचे सांगून ठाणेकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याचे सांगितले. दरवर्षी नालेसफाई होतच नाही परंतु पैसे काढले जातात, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले तर आ. निरंजन डावखरे यांनी नालेसफाई ही फेल गेली आहे असे सांगून महापालिकेकडून नालेसफाई ही ७५% केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना ते साफ खोटं ठरलं असून भाजपा याचा तीव्र निषेध करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर, ठेकेदारांवर तातडीने कार्यवाई करावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी केली आहे. 

नाले सफाई करत असताना कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे यावेळी गटनेते मनोहर डुंबरे, नारायण पवार यांनी सांगितले. 

 313 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.