गरोदर स्तनदा मातांसाठी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र निर्माण करा महापौरांचे आयुक्तांना पत्र

ठाणे – शासनाने गरोदर महिला व स्तनदा माता देखील लस घेवू शकतात असे जाहिर करु न यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देखील निर्गमीत केल्या आहेत. त्यानुसार ठाणो महापालिका हद्दीत अशा गरोदर आणि स्तनदा मातांसाठी महापालिकेच्या प्रसुतीगृह असलेल्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
आज सर्वच नागरिक लसीकरण करु न घेण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे सर्व लसीकरण केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांना तासन तास रांगेत उभे रहावे लागते. परंतु या लसीकरण केंद्रावर गरोदर महिला व स्तनदा मातांना रांगेत उभे राहून लस घेणो अत्यंत जीकरीचे व त्नासाचे होणार आहे. शिवाय गर्दीमध्ये उभे राहिल्यास त्यांना संसर्ग होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आजचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गरोदर महिला व स्तनदा मातांचे तातडीने लसीकरण होणो अत्यंत गरजेचे आहे. महापालिका कार्यक्षेत्नातील सर्व गरोदर महिला व स्तनदा मातांना सुलभरित्या लस घेता यावी यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करणोबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मुंबई महानगरपालिकेनेसुध्दा यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्नातील सर्व गरोदर महिला व स्तनदा मातांचे लसीकरण करणोकरिता वैद्यकीय शक्यता तपासून करण्यात यावे. तसेच या महिलांना सहजरित्या लस घेता यावी यासाठी महापालिकेच्या प्रसुतीगृह असलेल्या ठिकाणी स्वतंत्न लसीकरण केंद्रे सुरु करणोबाबत तातडीने कार्यवाही करणोस संबंधितास आदेश व्हावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

 300 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.