ठाणे – कोरोना महामारीच्या काळात लोकडाऊनमुळे नाभिक समाजावर मोठं संकट आले आहे. आज या समाजासमोर जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याना मदतीकरिता आज मनोरमा नगर येथे नाभिक समाजातील लोकांना आमदार संजय केळकर व दत्ता घाडगे यांच्या हातून अन्नधान्याचे किट व मिठाई चे वाटप करण्यात आले. सतगुरू तेरी ओट ट्रस्ट यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे किट देण्यात आले.या ट्रस्टच्या प्रमुख देवेंदरजीत कौर,नौतेश्र्वर सिंग, ध्रुव चावला हे उपस्थित होते. कोरोना काळात लॉकडाऊन मुळे सर्व केशकर्तनालये बंद होते पण लाईट बिल व दुकानाचे भाडे चालूच असल्याचे त्यांची परिस्थिती बिकट होती त्यामुळे या सलून व्यावसायिक गरजू लोकांना आज अन्नधान्य वाटपाचे आयोजन मनोरमा नगर येथे भाजपचे ठाणे शहर जिल्हा चिटणीस दत्ता घाडगे यांनी केले होते. सर्व लाभार्थी लोकांनी याबाबत सतगुरू तेरी ओट ट्रस्ट चे आभार मानले. त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जितेंद्र मढवी, मस्त्यगधा पवार, चंद्रमा चौहान, रवी रेड्डी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
560 total views, 1 views today