ठाणे – कोव्हीड १९ या महामारी अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत त्याच बरोबर अनेकांना दोन वेळेचे अन्न मिळावण्यासाठी झगडावे लागत आहे. या महामारीत कोरोना बाधित रुग्णांना व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांना भारतिय अग्रवाल संमेलनाच्या ठाणे शाखेच्या वतीने सकस शाकाहारी जेवणाची घरपोच सर्व सुरु केली आहे. अखिल भारतिय अग्रवाल संमेलन ही देशातील अग्रेसर सामाजिक संस्था असून शहरी व ग्रामीण क्षेत्रासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. विविध सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक, आरोग्य-पर्यावरण विषयक अनेक लोकहितवादी कार्यांमध्ये रममाण असलेल्या या संस्थेशी जोडलेले अग्रवाल समाजातील अनेक नामवंत समाजसेवकांसह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी वेळोवेळी गोरगरीब-आदिवासींच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी कार्यक्रम राबवत असतात, कोरोनाकाळातही दया-करुणामयी, दानशूर असा या वृत्तीच्या सदर सामाजिक संस्थेने स्वतःला किंचित मात्र माणूसकीची विसर पडू दिली नाही. कोरोनाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तसेच घरात क्वारंटिन असलेल्या व्यक्तींना ज्या व्यक्तींना घरी स्वयंपाक करण्याचे संकट असेल या सगळ्यांना या संस्थेकडून दोन्हीवेळचे मोफत शाकाहारी जेवण देण्यात येत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश बंसीधर अग्रवाल, अध्यक्ष सुभाष अग्रवाल व राष्ट्रिय चिटणीस सौ.सुमन अग्रवाल यांनी दिली.या संस्थेकडून आत्तापर्यंत १००० गरजूना सकस शाकाहारी जेवणाची सोय केली आहे. जोपर्यंत आम्ही कोविडशी हा लढा जिंकत नाही, तोपर्यंत हा उपक्रम सातत्याने चालू राहील, अशी ग्वाही देत महेश अग्रवाल यांनी आवाहन केले आहे की, या बाबतीत विस्तृत माहितीसाठी गरजू व्यक्तींनी नितेश बंसल व संजय मित्तल व सरचिटणीस अनिल सज्जन अग्रवाल व अध्यक्ष सुभाष अग्रवाल यांच्याशी सम्पर्क करावे.
573 total views, 1 views today