आणखी १० संपर्क क्रमांक व मनुष्यबळ वाढविणार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे – कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता तात्काळ कोविड हॉस्पिटल्लमध्ये बेडस् उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोविड वॉर रूमचे सक्षमीकरण करण्यात येणार असून या वॅाररूमध्ये आणखी नवीन १० हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढविण्यासोबतच मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी आज संबंधित आरोग्य विभागाला दिले.
आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोविड वॉररूमच्या कामकाजाचा आढावा घेवून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे वॅार रूम कसे अधिक सक्षम करती येईल याची चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. देवगीकर, आरोग्य अधिकारी डॉ. खुशबू टावरी, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्यावतीने कोविड रूग्णांना बेडस उपलब्ध करून देण्यासाठी २४ तास वॅार रूम कार्यरत असून या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध कोविड रुग्णालये, उपलब्ध बेड्स, तसेच रुग्णवाहिका याची अद्ययावत माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
तिसरी लाटेमध्ये रूग्णांची संख्या वाढली तर नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये, त्यांना उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी, त्यांना बेड उपलब्ध करून द्यावा यासाठी कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी आणखी नवीन १० हेल्पलाईन संपर्क क्रमांक आणि त्याच पटीत मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले.
531 total views, 2 views today