ठाणे – खासदार राजन विचारे यांनी आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे तसेच शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांच्या तसेच उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बोटीचे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागील प्रलंबित कामांचा आढावा घेतला. त्यांच्या लोकसभा मतदार संघातील ठाणे ,नवी मुंबई व मीरा-भाईंदर ही शहरे बहुतांश खाडीकिनारी वसलेल्या आहेत नुकताच चक्रीवादळामुळे या खाडी किनारपट्टीवरील भाईंदर पश्चिमेकडील उत्तंन किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे तसेच त्यांच्या राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले त्याच बरोबर भाईंदर पश्चिम भागातील गावांमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले तसेच ठाणे घोडबंदर पट्ट्यातील कोलशेत ,वाघबीळ, बाळकुम, कासारवडवली ,मोगरपाडा ,ओवाळा ,भाईंदरपाडा, नागले या गावातील शेती करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले त्याच बरोबर नवी मुंबईतील खाडीकिनारी असलेल्या गावठाणातील घरांचे झालेल्या नुकसानीबाबत तसेच या चक्रीवादळामुळे पाम बीच मार्गावर सानपाडा मोराज सर्कल जवळ विशाल नारळकर या तरुणाचा विद्युत पोल अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याला राज्य शासनाकडून मदत मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा करावा असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या लोकसभा मतदार संघातील झालेल्या नुकसान भरपाई बाबत तातडीने पंचनामा करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. मागील झालेल्या चक्रीवादळामुळे उत्तंन येथील मच्छीमारांच्या झालेल्या नुकसान भरपाई बाबत विचारणा केली असता मत्स्यव्यवसाय विभागाकडून सन २०१९-२० च्या मासेमारी हंगामात चक्रीवादळामुळे मासेमारी करता आली नाही यासाठी राज्य शासनाने मच्छिमारांना आर्थिक सहाय्य घोषित केले त्यामध्ये 2 हजार 814 लाभार्थ्यांना उत्तन मधील मच्छिमार नौका व मासळी विक्रेता महिलांना 3 कोटी 70 लाखाची मदत मिळवून दिली याबद्दल खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले
खासदार राजन विचारे यांची मीरा भाईंदर शहरासाठी स्मशान भूमी व दफनभूमी साठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर शहरासाठी शहराबाहेरील मोकळ्या असलेल्या शासकीय जागा सर्व जातीय धर्मियांसाठी स्मशानभूमी व दफनभूमी करण्यासाठी मिळवून देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली
या पत्रामध्ये खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर शहराची १५लाखाहून अधिक असणारी लोकसंख्या शहरात १७ स्मशानभूमी व एकच मुस्लिम व ख्रिश्चन यांच्यासाठी दफनभूमी आहे या मीरा भाईंदर शहरात मुस्लिम व ख्रिश्चन नागरिकांची ही संख्या अधिक आहे त्यांना दफन भूमी ही अपुरी पडत आहे या महामारी च्या काळात मृत्यूची संख्या वाढत असल्याने आपण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने स्मशानभूमी व दफनभूमीसाठी शासकीय जागा महापालिकेला मिळवून द्यावी अशी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्या.
420 total views, 1 views today