ठाणे – कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपविण्यात ठाणो महापालिका प्रशासनाला यश आले आहे. परंतु आता कोरोनाची तिसरी लाट देखील येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीकोणातून ठाणे महापालिकेने काय काय उपाय योजना केल्या आहेत, याची माहिती तत्काळ उपब्ध करुन द्यावी अशी मागणी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी केली आहे. बालरोग्य तज्ज्ञांशी चर्चा विनिमय करून, वेबसंवाद साधून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून नियोजन करणे गरजेचे त्यानुसार आता पुढील उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना फटका बसू शकेल असे भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत राज्याचे नगरविकास मंत्नी आणि ठाणो जिल्हा पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असेल, तसेच स्थायी समिती सभेमध्ये सदस्यांनी या बाबत विचारणा केलेली आहे. सद्यस्थितीत चालू असलेले ग्लोबल, पार्किंग प्लाझा या कोवीड सेंटर बरोबर अजून नव्याने सुरू होत असलेल्या दोन सेंटरमध्ये लहान मुलांना बेड तसेच ऑक्सीजन मशीनची पुरेशी व्यवस्था करणे गरजे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवर चांगल्याप्रकारे काम केलेले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये याची पुनरावृत्ती होवू नये, लहान मुले, जेष्ठ नागरीक तसेच मध्यम वयोगटातील नागरिक यापैकी कुणालाच धोका निर्माण होवू नये यासाठी पूर्व अनुभवावरून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट न पाहता त्यापूर्वी लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून तातडीने उपाय योजना करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
401 total views, 1 views today