मुंबई – भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी
पालिका आयुक्तांची आज दुपारी महापालिकेत भेट घेऊन मुंबईतील आपत्कालीन स्थितीची माहिती घेतली.
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले असून अनेक भागात पाणी तुंबणे तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रात्री पासून मुंबईत निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करित असलेले मदत कार्य याबाबत महापालिकेत जाऊन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली व मदत कार्याची माहिती घेतली.
तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मदत कार्याची पाहणी त्यांनी केली. माहिम येथे एक झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले त्याचीही प्रत्यक्ष पाहणी केली. सोबत स्थानिक नगरसेविका शितल गंभीर ही यावेळी उपस्थितीत होत्या.
त्यानंतर ते म्हणाले की, मुंबईत ठिकाणी पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत. खार, वांद्रे, भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. काही मुंबईकरांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी झालेली कामे आणि आज निर्माण झालेली परिस्थिती यापासून सत्ताधारी आणि कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
387 total views, 1 views today