शामलाल नायर ट्रस्ट व स्वप्नील महिंद्रकर यांच्याकडून पाच हजार लोकांना गेल्या पंधरा दिवसात जेवण वाटप

ठाणे – आज कोरोनाच्या   पार्श्वभूमीवर जिथे लोक घरातून बाहेर निघाला घाबरत आहेत तिथेच श्यामलाल नायर चारिटेबल ट्रस्ट आणि स्वप्नील महिंद्रकर यांच्या विद्यमानाने आरोग्य केंद्रातील परिचारिका,  स्मशानभुमीतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, कोरोना पॉझिटिव पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना गेल्या पंधरा दिवसापासून जेवणाची उत्तम सोय करून देण्यात आली आहे
गेल्या पंधरा दिवसापासून जवळपास ५000 लोकांपर्यंत जेवण पोचवण्यात आले आहे तसेच ठाण्यातील  लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणारे लोकांसाठी पाण्याचे देखील वाटप नित्यनियमाने होत आहे ट्रस्ट आणि महिंद्रकर यांचे पुढील काही दिवसात दहा हजार लोकांपर्यंत  जेवण पोचवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी संस्थेचे पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत घेणार असुन जास्तीतजास्त लोकांन पर्यन्त पोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.  संस्थेचे पदाधिकारी देवेंद्र कदम, सुशांत साळवी, संतोष कांबळे ,मनीष सावंत रितेश राऊत, दीपक शिंदे,संकेत गलांडे यांच्या प्रयत्नाने सदर वाटप यशस्वीरीत्या सुरू आहे

 488 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.