अवैध रेती उपसाविरोधात कारवाई ८० लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

ठाणे – अवैधरित्या सुरु असलेल्या रेती उपसावर ठाणे जिल्हा प्रशासन विभागाने गुरूवारी आणि शुक्रवारी मुंब्रा-चुहा खाडीपात्रात केलेल्या कारवाईत ४ सक्शन पंप आणि ३ बार्ज यांच्यासह ८० लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. अशाप्रकारे वारंवार कारवाई सुरू असून यामध्ये लाखोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात येत आहे.
 ठाणे तालुक्यात गायमुख खाडी, रेतीबंदर, मुंब्रा खाडी परिसरात अवैद्यरित्या रेती उपसा सुरु असल्याबाबतच्या अनेक तक्रारींचा भीडमार जिल्हा प्रशासनाकडे सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार युवराज बांगर, ,तहसीलदार रेतीगट शाखा, मुकेश पाटील, निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार,मंडळ अधिकारी सुभाष जाधव, अव्वल कारकून मनोज राबडे, महसूल सहायक सचिन देशमुख तसेच तलाठी रोहण वैष्णव, राहुल भाईर, धोंडीबा खानसोळे, अजित घरत व विश्वनाथ राठोड यांच्या पथकाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्यानुसारच गुरुवारी मुंब्रा चुहा खाडीपात्रात २ बार्ज व २ संक्शन पंप ओहोटी असल्याने बाहेर काढता न आल्याने ते खाडीपात्रातील पाण्यातच बुडवण्यात आले. तसेच २ बार्ज व १ संक्शनपप हे मुंब्रा खाडीकिनारी भागातील गणेश घाट येथे क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढुन शुक्रवारी गॅस कटरच्या सहाय्याने कट केले. या कारवाईत ४ संक्शन पंप प्रत्येकी पाच लाख प्रमाणे एकुण २० लाख व ३ बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे ६० लाख असा एकुण ८० लाख इतक्या रक्कमेचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार युवराज बांगर यांनी दिल

 386 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.