बेरोजगारी ओढावलेल्या नाभिक-वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्यवाटप आमदार संजय केळकर यांचा उपक्रम

ठाणे – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीमुळे उपासमारीचे संकट झेलणाऱ्या बारा बलुतेदारांना आमदार संजय केळकर यांनी हात दिला आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिक, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षाचालक आदी हातावर पोट असणाऱ्या बारा बलुतेदारां वर बेरोजगारीमुळे उपासमार ओढवली आहे. या घटकांना मागणी करूनही राज्य शासनाकडून मदत मिळाली नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. मात्र आमदार संजय केळकर हे मागील वर्षभरापासून या घटकांना विविध माध्यमातून मदत करीत आहेत. त्यांच्यातर्फे नाभिक कामगार व वृत्तपत्र विक्रेते यांना नुकतेच धान्यवाटप करण्यात आले.  केळकर विश्वस्त असलेल्या समतोल फाउंडेशन या संस्थेमार्फत हे धान्य वाटप समतोलच्या चरई येथील कार्यालयात करण्यात आल
 यावेळी समतोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शाह उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलूनची दुकाने बंद असल्याने नाभिक कारागिरांवर संकट कोसळल्यासारखे झाले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असल्याचे या लॉकडाऊनमध्ये दिसून येते. वृत्तपत्र विक्रेत्यांवरही तीच परिस्थिती ओढवली आहे. या जाणिवेतून केळकर यांनी तातडीने २०० नाभिक कारागीरांना व ५० वृत्तपत्र विक्रेत्यांना तातडीने धान्यांची व्यवस्था केली व त्याचे वाटप केले.  यापुढेही अशी मदत गरजवंतांना सुरू राहील, असे केळकर यांनी  सांगितले.

 302 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.