१४ मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर

ठाणे – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १४ मे २०२१ रोजी कोरोना मुक्तीची लढाई फत्ते करण्यासाठी  ठाण्यातील मावळी मित्र मंडळ, टेलिफोन एक्सचेंज शेजारी, चरई  येथे सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान आणि प्लाझ्मा नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोरोना महामारीमध्ये  रूग्णांना रक्त आणि प्लाझ्माची निकड भासू लागली आहे. या कोरोना विरोधातील लढाईत आपण रक्तदान करून रूग्णांना कोरोनामुक्त करण्याची महत्वाची मोहीम फत्ते करायची आहे आणि महाराष्ट्र धर्म जागवायचा आहे.  त्यासाठी ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांतर्फे  छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी  आपण रक्तदान करून कोरोनावर विजय मिळवू आणि  छत्रपती संभाजी महाराज यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाईल. तरी दानात श्रेष्ठ दान असलेल्या रक्तदान शिबिरात आपण सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठा जागृति मंच पानिपत ठाणे विभाग, शिवराय प्रतिष्ठान,   कर्तव्य- एक सामाजिक जाणीव संस्था (महाराष्ट्र), नवयुग मित्र मंडळ, मावळा संघटना, झेप प्रतिष्ठान, मराठा क्रांती सेवा संघ, मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा, कोलबाड मित्र मंडळ, छावा ढोल ताशा पथक ठाणे,सहयाद्री प्रतिष्ठान ठाणे, अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज, ठाणे,
पंचशील गणेशोत्सव मंडळ, मातोश्री प्रतिष्ठान, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,मराठा उद्योजक लॉबी , ग्रँड मराठा.फाउंडेशन, सकल मराठा समाज.दिवा आदी संस्थांनी  ठाणेकरांना केले आहे. 

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.