आयुक्त बंगला दुरुस्ती गैरव्यवहार प्रकरणी नगर अभियंता खडताळे यांना सेवेतून निलंबित करा-संजय घाडीगांवकर

गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री यांना पाठवले पत्र, सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी

ठाणे – ठाणे मनपा आयुक्त बंगला दुरुस्ती बाबत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी रुपेश पाडगावकर यांच्याप्रमाणे अनावश्यक खर्च करण्यासाठी जबाबदार असणारे नगर अभियंता रवींद्र खडताळे व अन्य अधिकारी यांनाही तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आयुक्त बंगला दुरुस्ती साठी एकूण निविदा रक्कम ५० लाख असताना नियमबाह्य पध्दतीने सदर  काम अंदाजे दीड कोटि पर्यंत गेले कसे याची चौकशी करण्यात यावी असे घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.मंजूर कामा व्यतिरिक्त बजेट दिले म्हणून रूपेश पाडगावकर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्याच पद्धतीने या गैरव्यवहारला जबाबदार असणारे व वारंवार बंगल्यावर स्थळ पाहणी करणारे नगर अभियंता रविंद्र खडताळे व सबंधित सर्व अधिकारी महेश अमृतकर ,भगवान शिंदे,सचिन भालेराव  यांचे निलंबन कधी करणार ?असा सवाल ही संजय घाडीगांवकर यांनी विचारला आहे.
 वाढीव कामाला आयुक्तांची मंजुरी होती का? त्यांची मंजुरी नव्हती तर मग संबंधित नगर अभियंता व इतर उपरोक्त यांना तात्काळ निलंबित का केले नाही? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 अशा अनियमितता घडवून अधिकारी भ्रष्टाचार करतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयुक्त बंगल्याची दुरुस्तीची निविदा याकडे घाडीगांवकर यांनी लक्ष वेधले आहे.

 347 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.