मोदी मत्सर हीच राज्याची प्राथमिकता आहे काय? – आशिष शेलार

मुंबई – राज्यात जनहितार्थ आम्ही सरकार सोबत आहोत पण दुर्दैवाने राज्य सरकार जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये दोनच बाबीं वारंवार दिसतात. एक म्हणजे मोदी मत्सरात हीच प्राथमिकता मानून निर्णय होतात की काय? आणि केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठीच निर्णय होतात की काय? असे प्रश्न आम्हाला पडतात, अशा शब्दांत राज्यातील आघाडी सरकारवर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी समाचार घेतला.
राज्यातील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसिकरण अद्याप पुर्ण झालेले नाही असे आज समोर आले आहे. तसेच ४०% फ्रंटलाईन वर्कर्संना दुसरा डोस उपलब्ध होत नाही. तिसरीकडे ज्येष्ठ नागरिक आणि
४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना वणवण करावी लागते आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसच देऊ शकत नाही असे सरकार सांगते आहे. राज्य सरकारचे योग्य नियोजन नसल्याने अशी वणवण नागरिकांना सहन करावी लागते आहे.
आमची आघाडी सरकारला विनंती आहे हवे तर आमच्या निवेदनांना उत्तर देऊ नका, आमच्या पत्रांना हव तर केराची टोपली दाखवा पण किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या. आपले राजकीय हीत बाजुला ठेवून जनहिताला प्राधान्य द्या, असे आवाहन आमदार अँड आशिष शेलार यांनी केले.
आघाडी सरकार निर्णय घेताना वारंवार राजकीय हित डोळ्या समोर ठेवते. केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात राज्यातील जनतेचे हाल केले जात आहेत. जेव्हा लस आली तेव्हा राज्यातील एका कँबिनेट मंत्र्यांनी ही मोदी लस असल्याचे विधान करुन गैरसमज पसरवले. नंतर केंद्र सरकारने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस द्या सांगितले ते काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही. तर केंद्राने जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याच्या सुचना केल्या तेव्हा राज्य सरकारने ४५ वयोगटाची मागणी केली. अशा प्रकारे प्रत्येक वेळी राजकीय हीत साधले जात आहे हे दुर्दैवी आहे, असे ही आमदार अँड आशिष शेलार म्हणाले.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.