सरकारच्या अनियमितपणामुळे लसीकरणास नागरीकांची होणारी ससेहोलपट – आ.रवींद्र चव्हाण

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या करोना लस मोहिमेवर माजी राज्यमंत्री तथा डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांनी टिका केली आहे.डोंबिवली येथील पत्रकार परिषदेत महाआघाडी सरकार, राज्यशासन, कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन  यांच्या अनियमित लसमोहिमेमुळे नागरीकांची होणारी ससेहोलपट  पत्रकारांसमोर आमदार चव्हाण यांनी  मांडली.

आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत  पत्रकारांना माहिती देताना सांगितले कि, आरोग्य  व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्याचे काम शासन आणि पालिका प्रशासनाचे आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. करोना काळात मोठ्या प्रमाणात लस पुरवठा होणे गरजेचे होते.मात्र तसा प्रयत्न होत नाही. लस पुरवठा करणे केंद्राची जबाबदारी असली तरी योग्य वाटप राज्यशासनाने करायला हवेत.मुंबई महानगर प्रदेशात नागरिकांना स्थलांतर वारंवार करावे लागते.अश्या ठिकाणी कमी प्रमाणात लस देणे नियोजन शुन्य कारभार आहे.कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त सर्व ठिकाणी लस सुरु झाल्याबद्दल पाट थोपटून घेत आहेत.परंतु वस्तूस्थिती वेगळी आहे. लस केंद्रात ७ दिवसात फक्त १०० लस कुप्या देण्यात आल्या.तर काही केंद्रात लस देण्याचा कार्यक्रम ऐनवेळी रहित केला जातो.यामुळे गोंधळ होतो.२०लाखांच्या लोकसंख्या असलेल्या शहरात कमी प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. करोना काळात नागरिकांना आरोग्य सुविधा देणे, लस, रे मेडेसीवीर, व्हेटीलेटर पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.परंतु रुग्णालयात हलगर्जीपणा सुरु आहे. महाआघाडी सरकारचा महापालिकेच्या कारभारावर अंकुश नाही.लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट सुरु आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.लस कुठुन आणायची,कशी आणायची ते पालक मंत्र्यांनी ठरवावे मुंबई ला लस मिळते.तर उपनगरात सुध्दा लस मिळाली पाहिजे.नागरिकांना व्यवस्था उपलब्ध करुन देणे हि शासनाची जबाबदारी आहे.हि व्यवस्था शासन म्हणून करणार नसाल तर आम्हाला उग्र आंदोलन करण्याची गरज भासू लागली आहे. असा इशारा देत व्यवस्था देत नसाल तर निष्क्रिय असल्याचे कबूल करा. असा टोला दिला.लसीच्या तुटवडा भासविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेशात होत आहे. कल्याण डोंबिवलीत जास्तीचे लसीकरणाची सोय करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे ती पुर्ण करावी अशी मागणी आ.रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

 568 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.