१० लाखाची खंडणी दिली नाही म्हणून अपहरण केल्याचा कारखानदाराचा आरोप

फरार तीन अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकण्यास यश येणार ?

 डोंबिवली – १० लाख रुपये दे नाहीतर तुझ्या मुलाला मारू.. अशी धमकी गेल्या चार –पाच दिवसांपासून रुद्रा इनमल वोर्क प्रा.ली.कंपनीचे मालक रंजित झा यांना अपहरणकर्त्यांनी दिली होती.या धमकीकडे झा यांनी फारसे लक्ष दिले नाही.आपल्या धमकीला झा भिक घालत नाही असे  दिसल्यावर सहा अपहरणकर्त्यांनी झा यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्याचा कट रचला. ठरलेल्या प्लानिंगनुसार अपहरणकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी झा यांच्या कंपनीसमोर येऊन झा यांना मारहाण करत कारमध्ये जबरदस्ती कोंबून नेले.या घटनेतील तीन अपहरणकर्त्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.घटना घडून दोन दिवस उलटले असून उर्वरित तीन अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश येईल का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

शरद प्रकाश शेट्टे उर्फ बाबू ,प्रतिक जनार्धन कचरेकर,समीर दत्तात्रय मोरे असे अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे असून प्रेम राठोड (सचिन ), कैलास पावर आणि परडी असे फरार अपहरणकर्त्यांची नावे असल्याची माहिती रुद्रा इनमल वोर्क प्रा.ली.कंपनीचे मालक रंजित झा यांनी दिली.काही दिवसांपूर्वी झा यांचे या सहाजणांबरोबर भांडण झाले होते.काही दिवसांनी भांडण मिटल्यावर झा यांच्याशी पुन्हा हे सहाजणांनी नेहमीप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. अचानक झा यांना अपहरणकर्त्यांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितली.आपली थट्टा करत असल्याचा समज झाल्यान झा यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.पुन्हा या सहाजणांनी झा यांना `१० लाख रुपये दे नाहीतर तुझ्या मुलाला मारू`अशी धमकी दिली. यावेळी मात्र झा यांनी धमकी ऐकल्यावर हे प्रकरण काही वेगळच असल्याचे ओळखले.शुक्रवारी झा हे दुपारच्या दरम्यान कंपनीत काम करत असताना सहाजणांनी कंपनीसमोर आले. झा यांना कंपनीबाहेर बोलावून पुन्हा एकदा विचारले कि १० लाख रुपये खंडणी देणार कि नाही असा दम भरला. मात्र झा यांनी न घाबरता १० लाख रुपये माझ्याकडे नाही असे उत्तर दिले.या उत्तराने सहाजण खूप संतापले. त्यांनी झा यांना कंपनीसमोरच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने सहाजणांनी झा यांना कारमध्ये कोंबून निघून गेले. गेटसमोरील वॉचमन रामू जगताप यांनी घातलेला सर्व प्रकार पहिला.झा यांचा मुलगा सुरज हा कंपनीत आल्यावर त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. अपहरणकर्त्यांनी झा यांना कारमध्ये तोंडात गोळा कोंबत पोटावर पिस्तुल रोखले होते.आपला जीव घेतील या भीतीने झा यांनी हालचाल केली नाही. झा यान मारहाण करून अपहरणकर्त्यांनी दातिवली येथील माय सिटी रोडवर कारमधून बाहेर काढून फेकले. झा यांनी क्षणाचाही विलंब न लावता येथील पळूनजाण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये बसलेल्या अपहरणकर्त्यांनी झा हे पळत असल्याचे पाहून पुन्हा कार वळवून झा यांना पडकले. झा यांना दिवा येथील स्मशानभूमिजवळ नेऊन पुन्हा मारहाण केली.

अश्या प्रकारे भरदिवसा डोंबिवलीतील एका कारखानदाराचे त्याच्याच कंपनीसमोर अपहरण केले जाते.लॉकडाऊनच्या दिवसात अपहरणकर्त्यांनी अश्या प्रकारे डेरिंग दाखवून एकप्रकारे पोलीसांसमोर आव्हानच उभे केले आहे.तर दुसरीकडे कारखानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसते.

 580 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.