ठाणे शहर पोलीस अधिकारी व अमलदारांचे ९४.७६ टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकर

ठाणे – कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावणारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ९४.७६ टक्के पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७८.७२ टक्के पोलीसांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरीत पोलीसांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालया मधील पोलीसांचे लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास पोलीस उप आयुक्त, मुख्यालय २, ठाणे शहर यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना योद्ध्यांची भुमिका बजावणारे ठाणे शहर पोलीस दलातील अधिकारी / अंमलदार कोरोनाच्या संकट काळामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील एकुण २१४७ पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी २०७९ पोलीस उपचार घेऊन परतले आहेत. तर दुर्देवाने ३५ पोलीसांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सध्या पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्यावर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर काही पोलीस होम क्वारंटाईन राहुन उपचार घेत आहेत. सदर सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांची प्रकृती व्यवस्थित आहे. सध्या ३४ पोलीस उपचार घेत आहेत. लसीकरण झाल्यामुळे त्यांपैकी २४ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. लसीकरणाचे सकारात्मक परिणाम ठाणे शहर पोलीसांमध्ये दिसून येत आहे. लसीकरण न झालेल्या पोलीसांमध्ये बहुतांश गरोदर महिला पोलीस, स्तनदा माता व वैदकीय कारणास्तव लस न घेऊ शकत असलेले पोलीस आहेत. तरी लसीकरण राहीलेले पोलीसांचे डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घेण्यात येणार

पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मध्ये कोविड १९ विषाणूचा संसर्ग / प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच शाररीक अंतर राखणे यासोबतच त्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई, व इतर विभागांकडुन प्राप्त सुचना व आवश्यक काय काळजी घ्यावी याबाबत वेळोवेळी संबंधीतांना कळविण्यात येत आहे.

 490 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.