ठामपा हद्दीत प्रभागनिहाय रक्तपेढी सुरू करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

ठाणे – कोरोना संकट काळात ठाणेकर रुग्णांना योग्यवेळी रक्तपुरवठा व्हावा व रक्तदात्यांनी रक्तदान करणे सुलभ व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांमध्ये प्रभागनिहाय रक्तपेढ्या सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे महासंकट घोंघावत असताना  रुग्णांना तातडीने प्लाझ्मा व रक्तपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ९ प्रभाग समित्या असून ठाणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहरात रक्तपेढ्या अल्प प्रमाणात आहेत. प्रभागनिहाय एक रक्तपेढी उपब्लध करून दिल्यास रक्तदान करणारे रक्तदाते व रक्त घेणारे रुग्ण यांना खूप मोठा दिलासा मिळेल, असा आशावाद करीत प्रत्येक प्रभाग समितीत १ रक्तपेढी सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केवळ कळवा शिवाजी रुग्णालयात ठामपाची एकमेव रक्तपेढी असून ठाणेकरांना खासगी रक्तपेढीची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांमध्ये रक्तपेढ्या सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आहे.

 312 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.