मुंबई -रोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चँनलमधुन परमबिर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप आता समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांची भुमीका संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वझे व परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास NIA करीत आहे. म्हणुन मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या खोटया आरोपावरुन माझ्यावर जो CBI ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे.
638 total views, 2 views today