ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना बढती

ठाणे – ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बढती मिळाली आहे. त्याच्या पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या ठाणे शहर पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखाल यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आला आहे.
फणसळकर यांची ३१ जुलै २०१८ रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त पदी विराजमान झाले होते. दरम्यान आपल्या निवडणूकीत जवळपास ९० टक्के पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अशाप्रकारे फणसळकर यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी आणि कोरोना काळात त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वर्गाने चांगल्या तऱ्हेने हाताळलेली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच राज्याबाहेर जाणाऱ्या मजूरांना पोलिसांनी दिलेला मदतीचा हात, रक्तदानाचे कार्य आणि कोरोनामुळे शहीद झालेल्या कुटूंबीयांच्या पाल्यांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस महासंचालकांनीही मुक्त कंठाने स्तुती केली होती.
फणसळकर यांच्यासह विशेष कृती अभियानचे अपर पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांची राज्याच्या नागरी संरक्षण संचालक पदी तर राज्याचे लोहमार्ग अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्रोई यांची न्यायिक तांत्रिक महासंचालक पदी बढती मिळाली आहे. याबाबत तसा अध्यादेश ४ मे रोजी काढण्यात आला असून त्या अध्यादेशावर उपसचिव कैलास गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.