कोव्हॅक्सीनचा पुरवठा तातडीने देण्याची मागणी महापौरांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन


ठाणे – कोरोनाला अटकाव करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. त्यानुसार आता र्पयत ठाण्यात ३ लाखाहून अधिक नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु आता लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातही कोव्हीशिल्डचा अपुरा साठा येत आहे. तर कोव्हॅक्सीनचा साठाच येत नसल्याने यापूर्वी ज्या नागरीकांना लस घेतली आहे, त्यांना दुसरा डोस देतांना अडचणी येत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनचा साठा तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सुरूवातीच्या काळात सर्वत्न कोविशिल्ड लस उपलब्ध होती व त्यानंतर कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्यानंतर काही नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. परंतु सद्यस्थितीत कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस देणो गैरसोईचे झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी निघून जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे सर्वच नागरिक दुसऱ्या डोससाठी महापालिकेकडे व महापौर या नात्याने माझ्याकडे सातत्याने विचारणा करीत असल्योही त्यांनी या पत्रत नमुद केले आहे.
त्यात आता १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. या अनुषंगाने महापालिकेने ही लसीकरण मोहिम सुरू केलेली आहे. परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना कोवॅक्सिनचाच डोस देण्यात येणार आहे. मागील दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये या नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात आलेला आहे. आगामी काळात केवळ १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचाच डोस देणो निश्चित केल्यास इतर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होणार नाही त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच १८ ते ४४ या वयोगटासाठी निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रावर ज्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळाला नाही असे नागरिक देखील गर्दी करतील व ४५ वर्षे व त्या पुढील नागरिकांना या केंद्रावर डोस देण्यास मनाई केल्यामुळे सदर मोहिम राबविणो गैरसोईचे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणो महापालिका क्षेत्नात आतार्पयत २३२२२ नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला असून यापैकी केवळ ५४९८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. उर्वरीत १७७२४ नागरिकांना दुसरा डोस विहित मुदतीत देणो अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे याप्रमाणात ठाणो महापालिकेस कोवॅक्सिनचा साठा तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.